सध्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) राज्यभर चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, या योजनेसंदर्भात महिलांना अनेक प्रश्न आहेत. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? इथपासून ते अर्ज कसा कारवा? याबाबत महिला विचारत आहेत. याच पार्श्वभूमीवर तुमच्या हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता? त्यासाठी प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊ या.